कोरोंना विशेष

बीड दहा तर नांदेड अकरा दिवसांसाठी लॉकडाऊन;

बीड/नांदेड दि.24 मार्च-  राज्यात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन (lockdown) करण्याची घोषणा तिथल्या प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज दि.24 मध्यरात्री पासून तर बीड (Beed) जिल्ह्यात दि.25 मार्चच्या मध्यरात्री 12 नंतर दि.26 मार्च पासुन 4 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक लॉकडाऊन (lockdown) करण्यात येत आहे.

(Beed locked down for ten days while Nanded for eleven days;)

या दरम्यान शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार, सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल्स, जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकन ची दुकाने, पार्लर, सलून, सार्वजनिक ठिकाणी फिरणे हे सर्वतः बंद राहणार आहे.

व्यापक जनहितास्तव नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड (Nanded) जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यानी दि.25 मार्चच्या मध्यरात्री पासुन बीड (Beed) जिल्ह्यात 10 दिवसांसाठी हा निर्णय घेतला आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. नांदेड प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानूसार

या सेवांना राहणार सवलत
अत्यावश्यक सेवेतील दवाखाने,खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, पेट्रोल पंप, गॅस पंप, ही चोवीस तास सुरू राहणार आहेत.

सकाळी 7 ते 12 या दरम्यान किराणा दुकाने चालू ठेवता येतील.
*त्याच प्रमाणे दूध विक्री, वर्तमानपत्र, पाणीपुरवठा, फळ व भाजीपला विक्री सकाळी 7 ते 10 दरम्यान चालू राहणार आहे.
*लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करणाऱ्या व लॉक डाऊन दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यात यावेळात अंशतः बदल असुन सकाळी 7 ते 9 असा बदल असणार आहे. थोड्याच वेळात याबाबत अधिकृत प्रसिध्दी पत्र देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!