बीडच्या ‘पुष्पा’ला पोलिस कोठडी; जिल्ह्यात केजच्या ‘त्या’ नगरसेवकाचीच चर्चा.

बीड दि.28 जानेवारी – बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये नुकतेच नगरसेवक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर चंदन तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात एकच चर्चा आहे. यातील तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

(Beed’s ‘Pushpa’ in police custody; Discussion of ‘that’ corporator of Kaij in the district.)

सध्या सर्वत्र पुष्पा (Pushpa) या चंदन तस्करी वर आधारीत चित्रपटाची धूम आहे. यातच बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे चंदन तस्करी प्रकरणात केजच्या एका नवनिर्वाचित नगरसेवकावर गुन्हा नोंद झाल्याने बीडचा पुष्पा म्हणून चर्चा होवू लागली.

केज (Kaij) नगरपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य (corporator) बाळासाहेब जाधव यासह तीन जणांवर चंदन तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनूसार बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांच्या शेतातून बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे बेकायदेशीररित्या चंदनाची झाडे तोडायचे.

या कामासाठी त्यांनी काही लोकांना हाताशी घेऊन त्या परिसरातील चंदनाच्या झाडांची छाटणी करायचे. आणि देवराव कुंडगर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तोडलेली झाडे तासून त्यातील चंदन काढून शेडमध्येच लपवून ठेवायचे. ही माहिती सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कुंडगर यांच्या शेडमध्ये छापा मारला असता एक व्यक्ती जागीच सापडला तर पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला 27 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडामधून काढलेला चंदनाचा गाभा पोलिसांना (Police) आढळला. त्याची किंमत 67 हजार 500 रुपये असून त्या सोबत एक दहा हजाराचा एक मोबाईल देखील आढळला आहे. एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आज आरोपीनां न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी (Police custody) सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!