शेती विषयक

सावधान … Beware बीड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस काळजीचे.

54 / 100 SEO Score

बीड दि.16 एप्रिल – बीड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस काळजीचे असून मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या शक्यतेमुळे जनतेने काळजी घेण्याचे अवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.

( Beware … next four days of worry for Beed district. )

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळीचा जोर वाढला आहे. काल बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात प्रचंड गारपिट झाली असून जिल्ह्यात पुढील चार दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर बीड जिल्ह्यात सतर्कता alert बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसील प्रशासनाला काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी दिले आहेत.

धारुर तहसील कार्यालयाचे आवाहन…
तहसीलदार माधवराव काळे व नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी जनतेस सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांनी काही बाबतीत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा अंदाज दिसल्यास नागरीकानी सुरक्षितता पाळण्याचे आवाहन व तात्काळ महसूल प्रशासनास कळवण्याचे आवाहन तहसीलदार माधवराव काळे, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!