सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका… क्रिकेट विश्वात खळबळ

कोलकता दि.२(न्यूज नेटवर्क)- भारतीय (Indian) संघाचा माजी कर्णधार आणि BCCI चे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यास हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिले आहे. यामुळे क्रिकेट (cricket)  विश्वात खळबळ उडाली असून गांगुलीचे चाहते त्याच्या साठी प्रार्थना करत आहेत.

सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या छातीत कळा आल्या आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. आज त्याच्यावर कदाचित अँजिओप्लास्टी (angioplasty) केली जाईल. या बातमीमुळे मात्र क्रिकेट (cricket)  विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. भारतीय (Indian) संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. BCCI चा अध्यक्ष झाल्यानंतर गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. सौरव गांगुली याने (Sourav Ganguly) ११३ कसोटीत ४२.१७ च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!