एसटी बाबत मोठ्या घडामोडी; त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मुंबई हायकोर्टात दाखल.

मुंबई दि.12 फेब्रुवारी – मागील तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या एसटी (msrtc) संपाबाबत आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता वाढली आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांचे प्रमुख मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

( Big developments regarding ST; Report of the three-member committee filed in the Mumbai High Court. )

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाला नकार दिल्यानंतर संप चिघळण्याची शक्यता होती. मात्र, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जवळपास 41 टक्क्यांची पगारवाढ देऊन नोकरीत पुन्हा रूजू होण्यासाठी आवाहन केलं होतं.

त्यानंतरही काही संघटना संपावर ठाम आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने संप चालू ठेवायचा, की मागे घ्यायचा यावर मोठा निर्णय येणं अपेक्षित होता. (ST Worker Strike) दरम्यान, एसटी महामंडळचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल (report) रात्री उशिरा मुंबई हायकोर्टात (mumbai high court ) सादर करण्यात आला. यासंदर्भात राज्य सरकारचे वकील पिंकी भन्साली यांनी माहिती दिली.

दरम्यान, एसटी महामंडळचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल (report) रात्री उशिरा मुंबई हायकोर्टात (Mumbai High court ) सादर करण्यात आला. यासंदर्भात राज्य सरकारचे वकील पिंकी भन्साली यांनी माहिती दिली.

काय आहे अहवालात ?
एसटी महामंडळचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मुंबई हायकोर्टात (Mumbai High court) सादर करण्यात आला आहे. या अहवालात काय आहे हे आता पुढील सुनवाणीत स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!