एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्री अनिल परब यांचं आवाहन.

मुंबई दि.4 मार्च – एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करता येणार नाही अशी शिफारस त्रिसदस्यीय समितीने केली आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कर्मचाऱ्यांना 10 तारखेच्या आत कामावर परतण्याचे आवाहन केले आहे.

( Big news for ST employees; Appeal by Transport Minister Anil Parab. )

गेल्या तीन महिन्यापासून एसटी विलनीकरण मुद्दा गाजत आहे. अजूनही मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी संपावर (Strike) आहेत. समितीचा अहवाल कर्मचाऱ्यांच्या बाजुने येईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आलेला आहे. या अहवालानंतर परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आव्हान केले.

आपण कामावर यावं, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावार यावं, जे कर्मचारी निलंबित झालेले आहेत, त्यांचं निलंबन (Suspension) मागे घेतलं जाईल त्यांनीही कामावर यावं, ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देण्यास आली आहेत ती नोटीसही मागे घेतली जाईल त्यांनीही कामावर यावं, जे कर्मचारी बडतर्फ झालेले आहेत, त्यांनी कायदेशीर प्रक्रियेने अपील करावं, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत, कागगारांची रोजीरोटी जाता कामा नये याची काळजी घ्या नोकरीपासून वंचित ठेवू नका असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. अहवाल आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) कामावर परतण्याचं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. 28 हजार कर्मचारी विनंतीला प्रतिसाद देत कामावर आले आहेत, अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर आलेले नाहीत.

यानंतरही कामगार कामावर आले नाहीत तर या कामगारांना नोकरीची गरज नाही असं आम्ही समजू. यानंतर आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करु, याची जबाबदारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची असेल. कुणाच्या अफवांना किंवा कुणाच्या भूलथापांना बळी न पडता कामावर या असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांनी कामावर यावं असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!