धक्कादायक … रिक्षा चालकाने प्रवाशी तरुणीस लुटले; केज तालुक्यातील प्रकार.

केज दि.9 डिसेंबर – प्रवाशी तरुणीस निर्जनस्थळी नेऊन अपेरिक्षा चालकाने धमकावून तरुणीकडे असलेले 3 हजार 900 रुपये आणि शैक्षणिक कागदपत्रे काढून घेतल्याचा प्रकार केज (Kaij) तालुक्यातील बोरीसावरगाव शिवारात घडला आहे. याप्रकरणी अज्ञात अपेरिक्षा चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Shocking … Rickshaw driver robbed a young passenger; Types of Kaij talukas.)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील कुंबेफळ येथून लक्ष्मी संजय वाहवळकर (वय 21, रा. वाघाळा ता. अंबाजोगाई) ही तरुणी बुधवारी (दि.8) रात्री 7 वाजेच्या सुमारास वाघाळा येथे जाण्यासाठी एका अपेरिक्षामध्ये बसली होती. अपेरिक्षात इतर प्रवाशी नसल्याने अपेरिक्षा चालकाने (Rickshaw driver) अपेरिक्षा हा दिपेवडगाव फाट्याहून बोरीसावरगाव शिवारात निर्जनस्थळी नेला.

तेथे या तरुणीस धमकावून तिच्याकडे असलेले 3 हजार 900 रुपये आणि शैक्षणिक कागदपत्रे काढून घेत तेथून पलायन केले. अशी फिर्याद (complaint) लक्ष्मी वाहवळकर यांनी दिल्यावरून अज्ञात अपेरिक्षा चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार रियाजोद्दीन शेख हे पुढील तपास करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!