धारुर क्राईम… तक्रार केली म्हणून महिलेवर ओढावला हा प्रसंग; पोलिसांत गुन्हा नोंद.

किल्लेधारूर दि.25 जुलै – महिला तक्रार निवारण केंद्रात (Women’s Grievance Redressal Center) आमच्यावर केस का केलीस म्हणून विवाहित महिलेला शिवीगाळ करून धमक्या दिल्याची घटना धारुर तालुक्यातील मोहखेड येथे घडली. या प्रकरणी सिरसाळा पोलिसात (Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Dharur Crime … The incident dragged on the woman as she complained; Crime recorded with the police.)

धारुर तालुक्यातील मोहखेड येथील एका महिलेचे 2014 साली माजलगाव तालुक्यातील समर्थ नगर चिंचगव्हाण येथील संतोष सरवदे या तरूणाशी लग्न झाले होते. लग्नापासून पैशाची मागणी करत सदर महिलेचा सतत छळ करण्यात आला होता. व्यवसायासाठी माहेरच्या नातेवाइकांकडून पैसे आन म्हणून महिलेस हाणमार करत शिवीगाळ करण्यात येत होती.

माहेरच्या लोकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने तिला घराबाहेर हाकलून देण्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली. या प्रकरणात पीडित महिलेने महिला तक्रार निवारण केंद्र (Women’s Grievance Redressal Center) बीड येथे सरवदे कुटुंबाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत संतोष मधुकर सरवदे, मधुकर देवराव सरवदे, सीताबाई मधुकर सरवदे‌ सर्व रा. समर्थ नगर चिंचगव्हाण तालुका माजलगाव तसेच प्रणिता गणेश बोबडे व गणेश बोबडे रा. गंगाखेड यांची नावे दिली होती.

याचा राग मनात धरून वरील सर्वांनी मोहखेड येथील महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने सिरसाळा पोलिसात (Police) दाखल केली आहे. या प्रकरणात सिरसाळा पोलीस स्टेशन (Police station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) प्रदिप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!