बीडच्या तरुणाकडून पाच देशातील नागरिकांना कोट्यवधीचा गंडा; तुरुंगातून केला प्रकार.

बीड दि. 22 नोव्हेंबर – सायबर गुन्ह्याअंतर्गत (Cyber Crime) शिक्षा भोगणाऱ्या बीडच्या तरुणानं पाच देशातील विविध नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याची बाब उघड झाली आहे. तो सध्या 2018 पासून मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भैरवगड कारागृहात शिक्षा भोगत आहे.

(Billions of rupees from Beed youth to citizens of five countries; Types of imprisonment.)

बीड (Beed) येथील मुळ रहिवासी असणाऱ्या अमर अनंत अग्रवाल या तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना गंडा (Money fraud) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुणानं हा गुन्हा दोन तुरुंग अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठं हवाला रॅकेट समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

संबंधित तरुण हॅकर असल्याने तुरुंगातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती करत, हे काम करायला भाग पाडल्याचा दावा आरोपी तरुणानं पोलीस (Police) चौकशीत केला आहे. यासाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आरोपी तरुणाला काही क्रेडिट कार्ड्स आणि लॅपटॉप उपलब्ध करून दिला होता. याच्या अधारे आरोपीनं तुरुंगात बसून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपीनं परदेशातील लोकांची बँक खाती (Bank account) हॅक करून त्यातील रकमेची आफरातफर केली आहे.

त्याने अनेक पंचतारांकीत हॉटेलांना देखील अशाच प्रकारे गंडा घातला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी आरोपीला भोपाळ (Bhopal) येथील तुरुंगात हलवलं आहे. अमर अग्रवाल याने ऑनलाइन गंडा (Online fraud) घालून हे पैसे हवालाच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय पोलिसांना आहे. यातील काही पैसे संबंधित जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाले तर काही पैसे अमरने स्वतः साठी फिरवल्याचा संशय आहे. बीडमध्येही हवालाचे पैसे आल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!