पुणे एमजी रोडवर अग्नितांडव; 500 दुकाने जळून कोट्यवधीचे नुकसान… मुंबईत पुन्हा आगीची घटना

पुणे दि.27 मार्च – पुण्यातील नेहमी गजबज असलेल्या महात्मा गांधी रोडवरील फॅशन स्ट्रीट (Fashion Street) मार्केटला आगीने थैमान घातले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने फॅशन स्ट्रीट वर असलेल्या कापडाची दुकाने व गोदामानं वेढा घातला. जवळजवळ साडेतीन तास सुरू असलेल्या या महाभंयकर अग्नितांडवात पाचशे दुकानांचा कोळसा झाल्याने फॅशन स्ट्रीटची राखरांगोळी होत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

(Agnitandav on Pune MG Road; Billions lost due to burning of 500 shops … Fire again in Mumbai)

महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट (Fashion Street) मार्केटमध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत आगीने मार्केटमधील शेकडो दुकानं कवेत घेतली होती. आगीचे मोठं मोठे लोळ आकाशाच्या दिशेनं जाताना दिसत होते. अरूंद रस्त्यावरून वाट काढत घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी आग विझवण्यास सुरूवात केली. तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजेच मध्यरात्री १ वाजता आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.

“रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर ५० जवान आणि १६ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. रात्री १ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत फॅशन स्ट्रीट मार्केटमधील ४४८ छोटी मोठी दुकानं जळून भस्मसात झाली,” अशी माहिती अग्निशमन दलाचे (Fire brigade) मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मुंबईत पुन्हा आगीची घटना
मुंबईच्या भांडुप परिसरातील आगीची घटना ताजी असताना प्रभादेवी (Prabhadevi) परिसरातून आणखी एका आगीची माहिती मिळते आहे. प्रभादेवी (Prabhadevi) याठिकाणी असणाऱ्या गॅमा हाऊस इमारतीला ही आग लागली आहे. गॅमा हाऊस इमारतीच्या बेसमेंट आणि तळमजल्याला ही आग लागली आहे. प्रभादेवीतून जाणाऱ्या वीर सावरकर मार्गावर ही चार मजली इमारत आहे. आग लागल्यानंतर एकच खळबळ याठिकाणी उडाली होती. दरम्यान लेव्हल 2 च्या या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी 4 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि पाण्याचे 8 जंम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!