बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव… बहिण भाऊ जखमी.

माजलगाव मधील घटना

माजलगावः दि.३१(प्रतिनिधी)- शनिवार दि.३० रोजी सांयकाळी सातच्या सुमारास माजलगाव शहरातील दुग्गड पेट्रोल पंपासमोर बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोघे जण जागीच ठार (Killed) झाले. या अपघातात (Accident) अन्य दोघे भाऊ बहिणीची प्रकृती गंभीर आहे.

पाथरी येथून माजलगाव कडे येत असलेल्या बसच्या पाठीमागे असलेल्या वडवणी तालुक्यातील देवगाव येथील पंचवीस वर्षीय युवक सुरवसे शुभम आनंद एकटा येत होता. यावेळी माजलगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या दुग्गड पंपाजवळ एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मोटरसायकलला त्याने जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात (Accident) दोन्ही मोटारसायकल चालक ठार (Killed) झाले आहेत. समोरून येणाऱ्या मोटारसायकल चालकाचे नाव झेटे गणेश गुलाब वय 22 वर्ष रा.घळाटवाडी असून अपघातात त्याचाही मृत्यू झाला आहे. त्याच गावातील बहिण-भाऊ पांडुरंग विष्णु शिंदे वय 22 वर्ष व कविता सुर्यकांत नरवडे वय पंचवीस वर्ष हे सोबत गाडीवर येत होते. ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात असून उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!