अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; माजलगाव विज केंद्रासमोरील घटना.

माजलगाव दि.26 मार्च – माजलगाव शहरा जवळील चिंचगव्हाण येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरील अपघात (Accident) शहरापासून जवळच असलेल्या 132 के व्ही वीज केंद्रासमोर (power station) राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावर (National Haighway) गुरुवार रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
(Youth killed in unidentified vehicle collision; Incident in front of the power station at Majalgoan.)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केसापुरी कॅम्प येथील रहिवासी सतीश संपतराव राऊत (25) हा युवक माऊली कॉम्प्लेक्स येथे वाचमन असणाऱ्या आपल्या वडिलांना भेटून केसापुरी कॅम्प येथील आपल्या घराकडे जात होता. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरून (National Haighway) 132 केव्ही उपकेंद्रा (power station) समोर आला असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
यावेळी पोलीस (Police) उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. सदरील युवक आपल्या वडिलांना एकुलता एक असल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस (Police) तपास करीत आहेत. सदरील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.