धारुर तालुक्यात 24 तासात 6 कोरोना बळी; निवृत न्यायाधीशांचेही निधन. नऊ गावे हॉटस्पॉट.

किल्लेधारूर दि.12 मे – कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बीड जिह्यात कहर दिसत आहे. ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित (Corona Positive) आढळत असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. धारुर तालुक्यात गेल्या 24 तासात तब्बल सहा कोरोना बळी (Corona Death) ठरले आहेत. तालुक्यातील आठ गावांत सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढली असून या हॉटस्पॉट (Hotspot) ठरत असलेल्या गावांस प्रतिबंधित क्षेत्र (Restricted area) जाहिर करण्याची शिफारस आरोग्य विभागाने केली आहे.
(6 corona victims in 24 hours in Dharur taluka; Retired judges also died. Nine villages hotspot.)
धारूर तालूक्यात ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तालुक्यातून दररोज 70 ते 80 कोरोना बाधित (Corona Positive) आढळत आहेत. यात 90 टक्के बाधित सध्या ग्रामीण भागातील आहेत. सध्या 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या नऊ गावांचा हॉटस्पॉट मध्ये समावेश आहे. या गावांत रेपेवाडी (14), कांदेवाडी (15), भोपा (17), पिंपरवाडा (17), चोरंबा (20), पहाडी दहिफळ (22), गोपाळपूर (32), फकीर जवळा (32) ही गावे समाविष्ट आहेत.
तालुक्यात ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहा गावांना प्रतिबंधित क्षेत्र (Restricted area) घोषित करणे अनिवार्य असल्याचे पत्र गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी तहसीलदारांना दिले आहे. रेपेवाडी, कांदेवाडी, भोपा, पिंपरवाडा, चोरंबा, पहाडी दहिफळ, गोपाळपूर, फकीर जवळा या गावाना पुर्ण प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होण्याची शक्यता आहे.
तालुक्याची सद्यस्थिती …
तालुक्यात सध्या एकुण कोरोना बाधितांची संख्या 3133 नोंद झाली आहे. तर एकुण नोंदनिकृत मृत्यूची संख्या 51 आहे. तालुक्याचा पॉझिटीव्हीटी रेट 11.0 टक्के आहे. तर मृत्यू दर 1.6 टक्के आहे. तालुक्यात सध्या 768 ॲक्टीव रुग्ण आहेत.
24 तासात सहा मृत्यू …
तालुक्यात गेल्या 24 तासात 6 मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. मृतात 49 वर्षीय पुरुष, व्हरकटवाडी, 70 वर्षीय पुरुष, देवदहिफळ, 50 वर्षीय पुरुष, सोनिमोहा, 60 वर्षीय पुरुष मैंदवाडी, 65 वर्षीय पुरुष चाटगाव, 70 वर्षीय पुरुष, धारुर यांचा समावेश आहे.
सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अजितकूमार मिश्रा यांचे निधन
येथील सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अजितकूमार गणेशप्रसाद मिश्रा वय 80 वर्ष यांचे कोरोना मुळे मंगळवारी सांयकाळी औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना निधन झाले. कटघरपूरा भागातील रहिवाशी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अजितकूमार गणेशप्रसाद मिश्रा यांना कोरोना झाल्याने सोमवारी उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले होते. मंगळवारी सांयकाळी उपचार सुरू असताना निधन झाले त्यांचे पार्थीहावर औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामधनआबा तोंडे, बबन बन्सी तोंडे व राणबापू बळीराम व्हरकटे यांचे निधन …
सोनिमोहा येथील मनमिळावू व्यक्तीमत्व , सोनिमोहा येथे 2019 पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतील 50 दिवस श्रमदान करणारे शिलेदार रामधनआबा तोंडे (50) व बबन बन्सी तोंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. तसेच व्हरकटवाडी गावचे माजी सरपंच राणबापू बळीराम व्हरकटे यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
केशवराव तिडके यांचे वृध्दापकाळाने निधन
तालूक्यातील रुईधारूर येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते सामाजिक व राजकीय कार्यात सतत अग्रेसर असणारे पुढारी नावानेच सर्व परिचीत केशवराव रामभाऊ तिडके (75) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी निधन झाले. त्यांचे पार्थीहावर रुईधारूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुन नांतवडे असा परीवार आहे. त्यांचे निधना मुळे सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे