बीड जिल्हयातील आज एकूण ८५ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी
केजच्या महिलेचा औरंगाबादमध्ये मृत्यू

बीड दि.१६(प्रतिनिधी) कोविड-१९ च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील ८५ थ्रोट स्वॅब
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे (स्वाराती वै महा.आंबाजोगाई वगळुन आहे)पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. तर केज येथील एका महिलेचा कोरोनामुळे औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय बीड ७२, उपजिल्हारुग्णालय, गेवराई २, उपजिल्हा रुग्णालय, केज ११, अशी एकूण बीड ८५ थ्रोट स्वॅबस्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान एक धक्क्कादायक बातमी समोर येत असुन औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना केज येथिल महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.