धक्कादायक… कोरोनामुळे प्रत्येक १६ व्या सेकंदाला एक मेलेलं बाळं जन्माला येईल;
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

डब्ल्यूएचओच्या (WHO) अहवालामध्ये कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढल्यास गर्भामधून बाहेर येणाऱ्या बाळांचा मृत्यू दर अधिक असेल असं म्हटलं आहे. हा धोका इतका अधिक आहे की दर १६ सेकंदांनी एक मेलेलं बाळं जन्माला येईल असं अहवालात म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) (डब्ल्यूएचओ), युनिसेफ आणि त्यांच्या इतर सहकारी संस्थांनी कोरोना (Corona) संदर्भातील एक इशारा जारी केला आहे. यामध्ये गरोदर महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळांसाठी कोरोना (Corona) धोका अधिक वाढल्याचे सांगण्यात आलं आहे. यामुळे दर वर्षाला २० लाख बाळांचा मृत्यू होईल असं डब्यूएचओने (WHO) म्हटलं आहे. विकसनशील देशांमध्ये या पद्धतीच्या मृत्यूचा दर अधिक असेल असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
२८ आठवडे गर्भाशयामध्ये वाढ झाल्यानंतर जन्मा आधीच बाळ गर्भाशयामध्ये दगावण्याचा स्टिलबर्थ (Stillbirth) असं म्हणतात. युनिसेफचे कार्यकारी निर्देशक हैनरिटा फोर यांनी, “दर १६ सेकंदांनी जगामध्ये कोणत्या ना कोणत्या आईला स्टिलबर्थचे (Stillbirth) दु:ख सहन करावं लागणार” अशी भीती व्यक्त केली आहे. योग्य काळजी घेणं, प्रसुती आधी योग्य देखभाल आणि सुरक्षित प्रसुती साठी योग्य डॉक्टरांची निवड करणे या माध्यमातून या प्रकरणांची संख्या कमी करता येईल असा विश्वासही हैनरिटा यांनी व्यक्त केला आहे. डब्ल्यूएचओने (WHO) प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये दरवर्षी २० लाख मेलेल्या बाळांची प्रकरण समोर येतील असं म्हटलं आहे.