किल्ल्यातील कामगारांना कपडे व फराळ वाटप करुन पाडवा साजरा

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) सध्या सर्वत्र दिपोत्सव सणांचा सण साजरा होत आहे. या सणांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून येथील पिलाजी बंधूनी परराज्यातून आलेल्या कामगारांसाठी नवीन कपडे व फराळ वाटप करत आज सकाळी पाडव्याच्या मुहुर्तावर अनोखी दिवाळी Diwali साजरी केली.
देशभर दिवाळी Diwali मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मात्र या दिवाळीतही येथील ऐतिहासिक किल्ल्यात Fort परप्रांतिय कामगार आपल्या कुटूंबियांसह घरदार सोडून काम करत आहेत. या कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी येथील कापड व्यापारी सुरेश पिलाजी, सतीश पिलाजी यांनी पुढाकार घेत आज दि.१६ सोमवारी सकाळी ८ वाजता किल्ल्यातील Fort कामावर जात सर्व कामगारांना नवीन कपडे व प्रत्येकास फराळ देवून दिवाळीचा पाडवा साजरा केला. यावेळी जलदूत विजय शिनगारे, सुरेश शिनगारे, श्रीराम सिकची, मुकदम नायडू उपस्थित होते.