आज एकट्या बीडमध्ये शतक; कोरोना कहर सुरुच; पहा काय आहे आजची परिस्थिती

बीड दि.12 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1717 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 165 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1554 जण निगेटिव्ह आली आहेत. आज दहाव्या 100 कोरोना पॉझिटीव्ह एकट्या बीड तालुक्यात आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज दुसऱ्या दिवशीही अंबाजोगाई तालुक्यात 27 रुग्ण आढळून आली. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(Century in Beed alone today; Corona havoc; See what the situation is today)
1. बीड- 100 7.माजलगाव-8
2. अंबाजोगाई-27 8.परळी-7
3. आष्टी- 4 9.पाटोदा-2
4. धारुर-1 10.शिरुर-3
5. गेवराई-9 11.वडवणी-1
6. केज-1
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.12 शुक्रवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या दिड शतकाच्या पुढे गेलीली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या तीन दिवसांपासून मोठी वाढ होत आहे.
दरम्यान, राज्यात आज कोरोनाने पुन्हा 14 हजारचा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली आहे.