अंबाजोगाईच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; 4 वर्षाची मुलगी रडत असल्याने उघडकीस आला प्रकार.

बीड दि.9 एप्रिल – अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा बुधवारी (7 एप्रिल) रात्री अमेरिकेत (US America) संशयास्पद मृत्यू झाला आहे. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या दाम्पत्याने आत्महत्या केली की त्यांचा खून (Murder or suicide) झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने सदरील प्रकार उघडकीस आला.
(Suspicious death of young Ambajogai couple in US; Type revealed as 4 year old girl crying.)
अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा मुलगा बालाजी हे आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने सहा वर्षापूर्वी अमेरिकेत (US America) न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाले होते. मात्र, बुधवारी बालाजी भारत रूद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय ३०) यांचे अमेरिकेत त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून (Bodies found) आले आहेत.
स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी तेथील पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी भेट दिली असता घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून (Bodies found) आले. भारतीय वेळेनुसार गुरूवारी (दि.8) सकाळी 9 वाजता तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली. या घटनेमुळे रूद्रवार कुटुंबीय मानसिक धक्क्यात आहे. मृत आरती रुद्रवार या गर्भवती होत्या अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून (Murder or suicide) झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे. या घटनेनंतर त्यांची चार वर्षीय चिमुकली विहा मात्र सुखरूप असून सध्या तिला शेजाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. रुद्रवार कुटूंबियांना याचा मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.