सोमवार पासुन नववी ते बारावीचे वर्ग सुरु; स्थानिक प्रशासनावर दिली ही जबाबदारी

मुंबई: दि.१८- येत्या सोमवार पासुन राज्यातील शाळा School आणि महाविद्यालये सुरु करण्याचा महाविकासआघाडी सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार सोमवार पासुन सर्वप्रथम नववी ते बारावी इयत्तेचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत. यानंतर टप्याटप्याने इतर इयत्तांचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने स्थानिक प्रशासनावर शाळा School संदर्भातील इतर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत.
काही दिवसांपुर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी मुख्यमंत्र्यांशी शाळा सुरु करण्यासंदर्भात चर्चा करुन दिवाळी नंतर शाळा सुरु करणार असल्याची माहिती दिली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Udhav Thakre यांनी मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर २३ नोव्हेंबर पासुन शाळा School सुरु करण्याची घोषणा केली. येत्या सोमवार पासुन राज्यातील शाळा सुरु होत असुन शिक्षण मंडळाने शाळा निर्जंतूकीकरण करणे, तापमान मापिका उपलब्ध करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर दिली आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करणार असल्याचेही यावेळी घोषणा करण्यात आली. सर्वप्रथम नववी ते बारावी इयत्तेचे वर्ग सुरु केले जातील. त्यानंतर परिस्थिती पाहून उर्वरित वर्ग टप्प्याटप्याने सुरु केले जाऊ शकतात, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.