बीड जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून होणार सुरु; नियमावली जाहिर.

बीड दि.4 फेब्रुवारी – राज्य शासनाने कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र बीड (Beed) जिल्ह्यात अद्यापही शाळा सुरु करण्याचा स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतला नव्हता. आज जिल्हा शिक्षण विभागाने (Education department) आदेश काढत आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश काढले आहेत.
(Classes VIII to XII in Beed district will start from Monday; Rules revealed.)
बीड जिल्ह्यात मागच्या कांही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाबाधित (Corona Positive) रुग्णांच्या पार्श्वभूमीवर फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता येत्या 7 तारखेपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत.
या आदेशात 15 ते 18 वयोगटातील लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाला संपर्क करुन तातडीने लसीकरण (vaccination) करण्याची सुचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक व व्यवस्थापनांना तशा सुचनांचे आदेश माध्यमिक शिक्षण (Secondary school) विभागाकडून आज दि.4 फेब्रुवारी रोजी देण्यात आल्या आहेत. यामुळे आता पुन्हा शाळा गजबजणार असल्या तरी प्राथमिक विभागाच्या शाळा (Primary school) सुरु होण्याची प्रतिक्षा राहणार आहे.