कोरोना लस घेतली की घेणार आहात? मंग घ्या हा आहार … अशी घ्या काळजी …

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सरकारच्या आणि सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय बनत चालला असताना लस घेण्या आधी काय खावं आणि नंतर काय खावं ? वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक देश कोरोनाच्या लसीवर वेगाने काम करत आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना कोरोना लस (Corona vaccine) देण्यात येत आहे. दुसरीकडे काही ठिकाणी लसीचे दुष्परीणाम देखील पाहायला मिळत आहेत. लस घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रोत्साहित सुध्दा केले जाते आहे. परंतु लस घेतल्यानंतर कोणता आहार घेतला पाहिजे हे सांगितले जात नाही. लस (Corona vaccine) घेतल्यानंतर आहारामध्ये खालील गोष्टीचा समावेश करायला हवा.
(Are you going to get the corona vaccine? Take this diet … take care of it …)
हिरव्या भाज्या- (Green vegetables)
आपण आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा (Green vegetables) समावेश केला पाहिजे. जसे की पालक , ब्रोकोली, मेथी ,अशा हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात करायला हवा.
या भाज्यामध्ये अँटीऑक्सीडेंटयुक्त असतात. त्या निगेटिव्ह एफेक्ट्सला लढा देऊन शरीराला मजबूत बनवतात.
कांदा आणि लसूण (Onion and garlic)
कडक उन्हापासून होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी कांदा हा गुणकारी आहे. याचे आहारात सेवन केलंच पाहिजे. तसेच आहारात लसूणचा वापर केल्याने शरीरातील विषाणू नष्ट होतात. कांदा आणि लसूण (Onion and garlic) हे प्रोबायोटिक्सयुक्त आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. यामुळे रोजच्या आहारात कांदा आणि लसूण यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
हळद (Turmeric)
हळदीला गुणकारी औषध म्हणून ओळखले जाते. स्वयंपाक घरात तर हळदी शिवाय कोणता पदार्थ तयार होत नाही. हळदीचा अनेक प्रकारे उपयोग केले जातो. जखम झाल्यास हळदीचा ओषध म्हणून वापर केला जातो. तसेच हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी ,कफ झाले असेल तर हळदीचा (Turmeric) दूध त्यावर रामबाण उपाय आहे.
सूप (Soup)
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करणसाठी सूप महत्वाची भूमिका पार पडते. यामध्ये टमाटर सूप ,पालकसूप याचे सेवन करू शकतो. सूप घेण्याचे दोन फायदे आहेत, ते म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि सूप पिल्याने आरोग्य चांगले राहते. सूप पचनाला हलके असते तसेच आजारातून बरे होण्यास मदत करते. सर्व खनिजे आणि जीवनसत्त्व असल्याने आहारात सूप चे सेवन करणे आवश्यक आहे तसेच सूप (Soup) घेतल्यानंतर रक्तदाबावर नियंत्रण राहते.
ब्लूबेरी (Blueberries)
ब्लूबेरी मध्ये मुबलक प्रमाणात अँटिओक्सीडेंट्स आणि पोषक तत्वे असतात . ब्लूबेरी मध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामध्ये असलेले फायबर, व्हिट्यामिन सी , व्हिट्यामिन क आणि पोटॅशियम शरीरासाठी फायदेशीर ठरते. ब्लूबेरी (Blueberries) चे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि ग्लुकोज नियंत्रित करण्यास मदत करते. सरकार कोविड-19 (Covid-19) व्हॅक्सीन घेण्याकरीता जनजागृती करत आहे. या महामारीवर मात करण्यासाठी स्वत:ला जागरूक राहणं आवश्यक आहे.
या पंचसुत्रीचा अंमल करा ….
1) भरपूर पाणी प्या
उत्तम आरोग्यासाठी शरीर निरोगी राहणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याचं सेवन करणं आवश्यक असतं. त्यामुळे लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतर मुबलक पाणी पिणं अत्यंत आवश्यक असतं. दिवसभर पाणी पिण्यानं शरीरात उर्जा निर्माण होते. ज्यामुळे गंभीर दुष्परिणाम होण्याची जोखीम कमी होते.
2) मद्यपान करू नये
ताप, थकवा पासून शरीराच्या दुखापतीपर्यंत, बरेच लोक कोरोनाव्हायरस विरूद्ध लसीकरणानंतरचे दुष्परिणाम अनुभवत आहेत. अशावेळी, हायड्रेटेड राहणं चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच, आपण अल्कोहोल पिणे टाळले पाहिजे. कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, जे या दुष्परिणामांना तीव्र करते. जर्नल अल्कोहोल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अल्कोहोलचे सेवन कमकुवत प्रतिकारशक्तीशीही जोडले गेले आहे.
3) प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळा
ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशिक करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, संतुलित आहार या कोरोना महामारीत आरोग्य निरोगी आणि उत्तम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोविड-19 लसीचा डोस घेण्याचा निर्णय घ्याल, त्यावेळी आहारात प्रोसेड फुड्सऐवजी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच सॅच्युरेटेड पदार्थ आणि अधिक कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन करणं टाळा.
4) संतुलित आहार घ्या
आम्ही नमूद केल्याप्रमाणे, एक योग्य आहार विशेषत: कोविड -19 लस (Covid-19) घेण्यापूर्वी आणि नंतर आरोग्यासाठी चांगले असते. कोरोना लसीचे सामान्य दुष्परिणाम म्हणून अनेकांना अशक्तपणा जाणवतो. हे आरोग्यदायी, पौष्टिक पदार्थ खाऊनच कमी केला जाऊ शकतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मते, प्रक्रियेबद्दल थोडीशी आश्वासन मिळण्याव्यतिरिक्त, हायड्रिड राहणे आणि निरोगी संतुलित आहार चिंताग्रस्त होण्यापासून थांबू शकते.
5) व्यायाम आवश्यक
लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर नियमित व्यायाम करणं चांगलं. सकाळी १ तास तरी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करणं कठिण असेल तर योगा करता येऊ शकतो.