बीड

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून बीड शहरात अडीच कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक उपस्थित

38 / 100 SEO Score

 

गेवराई, दि.१९ (प्रतिनिधी)

beed nagar parishad news बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.सुनेत्रावहिणी अजित पवार यांच्या नेतृत्वखाली आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून बीड नगर परिषदेला विकास कामांसाठी भरीव निधी मिळत असून शहरातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शहरात एकूण २ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आ. विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, बीड विधानसभा समन्वयक शेख मुजीब, सभापती निजाम शेख, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, सभापती संजय उडान य़ाच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यंदाची प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड पॅटर्ननुसार ; बीड पॅटर्नचा प्रस्तावाला केंद्राची मान्यता.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी बीड शहराला भरीव निधी उपलब्ध करून शहरामध्ये विविध विकासाचे कामे दर्जेदार करून बीड शहराचा कायापालट करण्याचा शब्द दिला होता. स्व.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतील विकास कामांना राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्य्ााच्या पालकमंत्री ना. सुनेत्रावहिणी पवार यांच्याकडून भरीव निधी मंजुर केला जात आहे.

आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून विकास कामांना मंजुरी मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यातूनच शहरात एकुण २ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, बीड विधानसभा समन्वयक शेख मुजीब, सभापती निजाम शेख,

स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, सभापती संजय उडान, नगरसेवक रंजीत बनसोडे, मनोज गोडसे, प्रमोद शिंदे, भैय्यासाहेब मोरे, महेश राऊत, इकबाल भाई शेख, शाहिद पटेल, प्रभाकर पोपळे, आनंद पवार, गजानन जवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, बीड शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा अधिक चांगल्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना सातत्याने गती देण्यात येईल. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला.

या दोन्ही विकासकामांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांची रस्ते व पाणी निचऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. कामे नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.

विकास कामांमध्ये सिमेंट रस्ते आणि नाली बांधकामाच्या दोन महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. अहिल्यादेवी होळकर पुतळा ते थीगळे नाना यांच्या घरापर्यंत 1 कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच प्रभाग क्रमांक २२ मधील नरसोबा नगर येथे माऊली हॉस्पिटल ते सनी गायकवाड यांच्या घरापर्यंत १ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता व नाली बांधकामालाही प्रारंभ करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!