जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश… विकेंड लॉकडाऊनसह या आहेत नवीन सुचना.

बीड दि.26 जून – राज्यातले सर्व जिल्हे लेव्हल-3 मध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनीही रात्री नवीन आदेश जारी केले आहेत. बीड जिल्हा अधिच तिसऱ्या स्तरावर असून विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) व लसीकरणाच्या (Vacccination) बाबत यंत्रणांना नवीन आदेश व मार्गदर्शक सुचना (guidelines) देण्यात आल्या आहेत.
(Collector’s orders … Here are the new instructions along with the weekend lockdown.)
राज्यात तिसऱ्या लाटेचं संकट गडद झाल्यामुळे पुन्हा कडक निर्बंध (restrictions) लागू होत आहेत. राज्य सरकारनं यासंदर्भात गाईडलाईन्स (guidelines) जारी केल्या आहेत. तसंच तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी केलेल्या तयारीनूसार बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनीही राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे नवीन आदेश काढले आहेत. काय तयारी करावी लागणार आहे यासंदर्भातला हा विशेष रिपोर्ट.
ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज.
नागरिकांचे लसीकरण (Vacccination) लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट (Antigen) बंधनकारक करण्यात आलेली आहे. सर्व यंत्रणांना स्वतंत्र पथक स्थापन करुन कोविड विषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
-नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणं, जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणं,
-कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी प्रोत्साहन देणं
-टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट या पद्धतीचा अवलंब करणे
-हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती आवश्यक
मोठ्या प्रमाणावर RTPCR चाचण्यांचं प्रमाण वाढवणं
-कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं
-गर्दी करणारे किंवा गर्दी होईल असे कार्यक्रम टाळणे
-कंटेन्मेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घेणं
काय सुरु काय बंद …
– अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
– इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू राहणार
– मॉल्स, थिएटर बंदच राहतील
– रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 4 सुरू राहतील
– दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल
– सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी
– खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
– चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परवानगी
– लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
– अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार
जिल्ह्यात आठवड्यात शनिवार व रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. म्हणजेच विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) सुरुच राहणार आहे. दिवसभर 5 वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर सांयकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.