आठ पोलिस निलंबित…. पहा का केली परभणीच्या एसपीनी कारवाई

परभणी: दि.३- परभणीचे (Parbhani) जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी मंगळवारी कर्तव्यात बेशिस्त, बेजबाबदार, नैतिक अधःपतनाचे वर्तन तसेच लाचखोर वृत्तीचे वर्तन करणाऱ्या आठ पोलिस (Police) कर्मचाऱ्यांना निलंबित (suspended) केले. यामुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वेगवेगळ्या स्वरुपाच्या अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांशी संबंध साधत आर्थिक फायदा करून घेणे, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून पैसे वसूल करणे अशा सर्वसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ पोलिस (Police) कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक जयंत मीना (Jayant Meena) यांनी निलंबनाची (suspended) कारवाई केली. यात परभणीच्या (Parbhani) कोतवाली पोलीस ठाण्यातील तीन, नवा मोंढा पोलीस ठाण्यातील दोन, तर नानलपेठ पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गैरप्रकारांना आळा घालणे अपेक्षित असतानाही अवैध व्यावसायिकांशी संबंध ठेवत त्यांच्याकडून पैसे वसूल करत होते. अवैध धंद्यांना चालना देण्याचा दोष या सर्वांनी केला असल्याचेही पोलीस अधीक्षक जयंत मीना (Jayant Meena) यांनी निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे. पोलीस अधिक्षक मीना यांनी केलेल्या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून सामान्य जनतेतून स्वागत होत आहे.