दिलासादायक … कोरोनाची दुसरी लाट ओसरली; पहा देशासह महाराष्ट्राची कोरोनास्थिती.

नवी दिल्ली/मुंबई दि.2 जून – देशातील कोरोनाच्या साथीवर सध्या मोठे नियंत्रण येत असून, आज देशात गेल्या 54 दिवसांतील सर्वात नीचांकी रुग्ण पातळी नोंदवली गेली आहे. तर महाराष्ट्रातही (Maharashtra) रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी होवून कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र दिसुन येत आहे.
(Comfortable … Corona’s second wave subsided; See the corona status of Maharashtra with the country.)
गेल्या 24 तासांत देशात एकूण 1 लाख 27 हजार 510 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या आता 2 कोटी 81 लाख 75 हजार 44 इतकी झाली आहे, तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2795 इतकी झाल्याने देशातील एकूण कोरोना बळींची संख्या आता 3 लाख 31 हजार 895 इतकी झाली आहे.
विशेष म्हणजे देशाचा पॉझिटिव्हिटीचा रेट आता 6.62 इतका झाला असून, देशात सध्या कोरोनाचे सक्रिय कोरोना बाधित (Corona Positive) 18 लाख 95 हजार 520 इतके झाले आहेत. मात्र, आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना अजूनही सतर्कता बाळगत कोविड नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राची समाधानकारक स्थिती.
महाराष्ट्रात (Maharashtra) आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 54,31,319 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.28 % एवढे झाले आहे.
मंगळवारी राज्यात 14,123 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज 477 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,52,77,653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,61,015 (16.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात खबरदारी म्हणून 15 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली असली तरी 22 जिल्ह्यात शिथिलता देण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधातही (restrictions) टप्प्या टप्प्याने निर्बंध (restrictions) शिथिल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) ओसरत असल्यामुळे हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.