शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं 100 व्या वर्षी निधन; साडे दहा वाजता अंत्यसंस्कार.

पुणे दि.14 नोव्हेंबर – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 100 व्या वर्षी आज (दि.15) सोमवारी पहाटे 5 वाजून 07 मिनिटांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पुरंदरे यांच्या निधनानं राज्यात शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काल सांयकाळी त्यांच्या निधनाच्या बातम्या येत असल्याने त्यांना न्युमोनिया झाला असून प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.
(Death of Shivshahir Babasaheb Purandare; Took his last breath at 100 years old.)

बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केलं. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chatrapati Shivaji Maharaj) बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. ‘जाणता राजा’ मध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात.

अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi), केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली वाहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे.

साडेदहा वाजता अंत्यसंस्कार.
सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्ममाशानभूमीत सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बाबासाहेब पुरंदरेंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणले असून पुरंदरेवाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!