विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; अंबाजोगाईतील दुर्दैवी घटना.

अंबाजोगाई दि.4 फेब्रुवारी – अंबाजोगाई (Ambajogai) शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रस्यावरील कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

(Two sisters drown in well; The unfortunate incident in Ambajogai.)

सदरील घटना आज (दि.4) सांयकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय 16) आणि सानिया अल्ताफ शेख (वय 18) अशी त्या बहिणींची नावे आहेत.

निदा आणि सानिया फॉलोअर्स क्वार्टर (Followers Quarter) भागात राहत होत्या. सकाळी वडील त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. दुपारी त्या दोघी तिथून परत येत असताना त्या विहिरीत बुडाल्या. स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह (Dead body) विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.

मयत बहिणींचे शव शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ (SRTR) रुग्णालयात पाठवून देण्यात आले. दरम्यान, दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या की, त्यांनी आत्महत्या (Suicide) केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!