Recruitment बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; 2138 वनरक्षक पदांसाठी भरती.

नागपूर दि.7 जून – Recruitment महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या वतीने ‘वनरक्षक गट-क’ Forest Guard च्या 2138 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापदासाठी बारावी विज्ञान शाखा किंवा भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित असा विषय घेऊन उमेदवार उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. अनुसूचीत जमातीसाठी, माजी सैनिक व नक्षली हल्ल्यात मरण पावलेले अथवा जखमी असणाऱ्या वनखबरे व कर्मचाऱ्यांचे पाल्य यांना दहावी उत्तीर्ण पात्रता आहे. Recruitment…. Job opportunities for 12th pass youth; Recruitment for 2138 Forest Guard Posts.
वनविभागातील वनरक्षक (गट क) Forest Guard पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने http://www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. इतक्या मोठ्या पदांसाठी जाहिरात आल्याने बारावी पास अनेक तरुणांना संधी Job opportunities मिळणार आहे. यासाठी 10 जून ते 30 जूनपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे.
वनविभागातील वनरक्षक (गट क) Forest Guard पदांकरिता केवळ http://www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.