अभिनेत्री करीना कपूर वर ‘बीड’ मध्ये तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे कारण…

बीड दि.14 जुलै – अभिनेत्री करीना कपूरने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र ग्रंथ बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ (Pregnancy Bible) या पुस्तकात वापरले आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात करीना कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
(Complaint lodged against actress Kareena Kapoor in ‘Beed’; Find out what’s up because …)
करीना कपूर (Film Actrees Kareena Kapoor) व सहकारी लेखिका आदिती शहा यांनी प्रेग्नसी बायबल (Pregnancy Bible)नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले. बायबल (Bible) शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्याचा आरोप करीना व लेखिकेवर करण्यात आला आहे.
अभिनेत्री करीना कपूर विरोधात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे (Alpha Omega Christian Federation) प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हाध्यक्ष मॅथ्यू जोसेफ, नितीन शिंदे, ब्रदर अरूण गायकवाड, मरियन रेड्डी व किशोर पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.
बायबल हा ख्रिश्चन धर्मियांचा पविञ ग्रंथ आहे, पुस्तकावरील बायबल शब्द तात्काळ हटवावा व अभिनेञी करीना कपूर, आदिती शहा व प्रकाशकांनी तात्काळ ख्रिश्चन समाजाची माफी मागावी. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक व अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केलेली.