शिक्षकांचे लसीकरण पुर्ण करा… शाळा सुरु करण्याची तयारी.

मुंबई दि.30 अॉगस्ट – काही दिवसांपुर्वी कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, अखेर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला.परंतू राज्यातील ज्या भागात कोरोना रूग्णसंख्या कमी आहे, त्या भागात ऑफलाईन (Offline) पद्धतीने शाळा सुरू करण्यात येणार असून शिक्षकांचे लसीकरण 5 सप्टेंबरपर्यंत पुर्ण करण्याचे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं आहे.
(Complete teacher vaccinations … Preparing to start school.)
राज्यातील काही जिल्ह्यात आणि शाळांमध्ये कोरोना रूग्ण (Corona patients) नाहीत. त्यामुळे त्या भागात शाळा सुरू करण्याचा विचार टास्क फोर्स (Task force) करत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत शिक्षकांच्या लसीकरणासाठी (vacccination) महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
राज्यातील काही भागात शाळा सुरू करण्याचा विचार होत असल्यानं शिक्षकांच्या लसीकरणावर राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. येत्या 5 तारखेपर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह (special drive) घेणार असल्याचं देखील टोपे यांनी सांगितल. त्यामुळे आता लवकर शाळा सुरू होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 18 वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचं, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे. त्यांनी कॉलेज सुरू करण्यास काही हरकत नाही, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं दिसत आहे.