धारुर तालुक्यातील ग्रामीण भागाची चिंता वाढली; आरोग्य विभागाकडून सहा गावांत ॲन्टीजन टेस्ट ड्राईव्ह.

किल्लेधारूर दि.17 एप्रिल – तालुक्यात गेल्या आठवड्यापासून ग्रामीण भागात कोरोना बाधित येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तब्बल सहा गावांत कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या बाधित गावातील ग्रामस्थांच्या कोविड-19 ची तपासणी वाढवण्यासाठी कृती आराखडा आखण्यात आला असून विशेष ॲन्टीजन टेस्ट (Antigen Test) ड्राईव्ह घेण्यात येत आहे.

(Concern increased in rural areas of Dharur taluka; Antigen test drive in six villages by the health department.)

सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात दररोज वाढलेली कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आता हजाराच्या वर सरकली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाधितांची संख्या लक्षणीय दिसत आहे. धारुर सारख्या छोट्या तालुक्यातही सध्या कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे.

तालुक्यातील अंजनडोह, खोडस, आवरगाव, कोळपिंपरी, आसरडोह, मोहखेड या गावात मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून येत आहे. यामुळे तालुका आरोग्य प्रशासनाने यागांवासाठी गावातील ग्रामस्थांच्या कोविड-19 ची तपासणी करण्याचे नियोजन केले. यासाठी तालुका आरोग्य कार्यालयाकडून कृती आराखडा आखण्यात आला असून विशेष ॲन्टीजन टेस्ट (Antigen Test) ड्राईव्ह घेण्यात येत आहे.

यासाठी भोगलवाडी व मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक नेमण्यात आले आहेत. भोगलवाडी केंद्राअंतर्गत अंजनडोह, खोडस, आवरगाव व कोळपिंपरी तर मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आसरडोह व मोहखेड या गावात ड्राईव्ह राबवणार आहेत. आज दि.17 शनिवारी ते 20 एप्रिल मंगळवार पर्यंत दररोज एका गावात ही तपासणी मोहिम होत आहे. आज पहिल्या दिवशी अंजनडोह येथे ॲन्टीजन मोहिम राबवण्यात येत असून दुपारी 1 पर्यंत 5 कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!