कोरोंना विशेष

उस्मानाबादच्या कारागृहात कोरोना विस्फोट; 272 पैकी तब्बल 129 कैदी पॉझिटीव्ह.

उस्मानाबाद दि.17 मे – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा झपाट्याने वाढत आहे. आता कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग थेट कारागृहातही पोहोचला आहे. येथील कारागृहातील 272 कैद्यांपैकी तब्बल 129 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

(Corona blast at Osmanabad jail; Out of 272, 129 prisoners tested positive.)

उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहात (Osmanabad District Jail) सध्या विविध गुन्ह्यांतील 272 कैदी आहेत. या कारागृहात कैदी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) येण्याची हि पहिलीच घटना आहे. एप्रिल महिन्यापासून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने शुक्रवारी कारागृहातील 272 कैद्यांचे आरटीपीसीआर (RTPCR test) चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. शुक्रवारी तपासणीत 31 जणांचा अहवाल कोरोना बाधित आला. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 84 जणांना बाधा झाल्याचे समोर आले. तर रविवारी 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अशा एकूण तीन दिवसांत 272 पैकी 129 कैद्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

जिल्हा रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करुन कारागृहातच औषधोपचार सुरु केले आहेत. उर्वरित कैद्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असले तरी पाच दिवसानंतर त्यांची पुर्नतपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक (Osmanabad District Jail) यांचा संपर्क होवू शकला नाही.

जिल्हा रुग्णालयातील 272 कैद्यांची शुक्रवारी आरटीपीसीआर (RTPCR test) चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 129 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रूग्णांना कारागृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी 6 डॉक्टर, कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे. निगेटीव्ह आलेल्या रुग्णांची पाच दिवसानंतर पुन्हा चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन बोडके यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!