दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत बालकांवर कोरोना संकट; पहा काय आहेत लक्षणे व कशी घ्याल काळजी.

बीड दि.19 मे – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांमध्येही कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) दिसून येत आहे. लसीकरण नसल्याने लहान मुलांनाच अधिक धोका आहे. त्यामुळे लाॅकडाऊन (lockdown) संपला तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टर देत आहेत. बीड जिल्हा प्रशासनाने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहिर केली नसली तरी इतरत्र बालकांची काळजी घेण्यात येत आहे.
(Corona crisis on children in the second and third waves; See what the symptoms are and how to take care.)
महाराष्ट्रात पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये कुठेच आढळून आला नव्हता. मात्र यावर्षीच्या दुसऱ्या लाटेत तो दिसून येत आहे. शेजारील लातूर जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा आलेख उंचावत आहे. गेल्या चार महिन्यात 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 500 हून अधिक लहान बालके आहेत. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका दर्शविण्यात आला आहे.
त्यामुळे लहान बालकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घरात कोणीच बाधित नसताना लहान मुले बाधित येण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय, काही मुलांना कुटुंबातील सदस्य बाधित झाला तरी कोरोना झाला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या लाटेत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आदी लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. दरम्यान, लाॅकडाऊन (lockdown) संपला तरी लहान मुलांना बाहेर जाऊ न देणे हेच आरोग्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
तिसऱ्या लाटेसाठी लातूर आरोग्य विभागाची तयारी
जिल्ह्यात लहान बालकांवर कोरोनाचे उपचार करता यावे, यासाठी दोन रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे. तसेच गरोदर मातांसाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी बेड वाढविले जाणार आहेत.
ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी 500 जम्बो सिलिंडर खरेदी केले जाणार आहेत. तसेच औषधींचाही मुबलक प्रमाणात साठा करून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, लहान मुलांसाठीही विशेष खबरदारी आरोग्य विभागातर्फे घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
काय आहेत बालकांमध्ये कोरोनाची लक्षणे?
लहान मुलांनाही ताप, सर्दी, खोकला, घशात व नाकात खवखव, जुलाबाचा त्रास, पोट दुखणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. काही मुलांना अंगावर पुरळ येत आहे. वास न येणे, चव न लागणे, थकवा येणे, जेवण न जाणे ही सर्वात आढळणारी लक्षणेही लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी आवश्यक आहे.
सध्या साैम्य प्रकारची लक्षणे आढळून येत असली तरी पालकांनी त्वरित मुलांची कोरोना चाचणी करावी. दुखणे अंगावर न काढता त्वरित उपचार घ्यावेत. लहान मुलांसाठी सध्याला लस उपलब्ध नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. लस उपलब्ध होईपर्यंत पालकांनी योग्य ती खरबदारी घेणे आवश्यक आहे.
उत्तराखंडमध्ये 16 हजाराहून अधिक संख्या …
उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) गेल्या दीड महिन्यात 16 हजाराहून अधिक लहान मुलांना तसंच 19 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. राज्याच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 9 वर्षे वयोगटातल्या 3 हजार 20 मुलांना तर 10 ते 19 वर्षे वयोगटातल्या 13 हजार 393 किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा (Corona Infection) पहिला रुग्ण राज्यात आढळून आला. साधारण एका वर्षामध्ये उत्तराखंडमधल्या (Uttarakhand) 10 हजार 740 लहान आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. पण एप्रिल या एकाच महिन्यामध्ये हा आकडा 18 हजारांच्या पुढे गेलेला आहे.