कोरोंना विशेष

महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालयात कोरोना विस्फोट; एकाच शाळेत कोरोना बाधितांची संख्या 82.

मुंबई  दि.28 डिसेंबर – अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील आणखी 28 विद्यार्थी आणि तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले असून, संस्थेतील अशा बाधित रुग्णांची एकूण संख्या 82 झाली आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. याशिवाय मिरज व पुण्यातील महाविद्यालयातही बाधितांची संख्या समोर आली आहे.

(Corona explosion at school, college; Number of corona sufferers in a single school 82.)

मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचा फैलाव आता होऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल 82 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानं खळबळ उडाली.

पुण्यात इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना बाधा..
नुकत्याच ऑफलाइन सुरू करण्यात आलेल्या शाळा आणि कॉलेजमध्ये कोरोनानं शिरकाव करायला सुरुवात केली आहे. आधी नवी मुंबईतील शाळा त्यापाठोपाठ आता नगरमध्ये मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. नगरनंतर पुण्यातही (Pune) विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील एमआयटी या शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव केला आहे. यात 13 विद्यार्थी बाधित आढळले.

मिरजमध्ये भावी डॉक्टर बाधित
मिरज (Miraj) शासकिय वैज्ञकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनिंना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर संपर्कातील विद्यार्थीनींची कोरोना चाचणी (Corona Test) घेण्यात आली असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. काॅलेज परिसरातील एका कार्यक्रमामुळेच एकाच वेळी सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. पोझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थिनींना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण 3 जानेवारी पासून
दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. भारतात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरणाला (vaccination) सुरूवात करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया आधीच्या नोंदणीसारखी असणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!