बीड जिल्ह्यात कोरोना कहर सुरुच; केज 100 तर धारुर 91, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.7 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4112 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1314 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2798 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Corona havoc continues in Beed district; Kaij 100 and Dharur 91, see taluka wise statistics.)

आज त्रेपन्नव्या दिवशी बीड तालुक्यात 419 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 242, आष्टी तालुक्यात 42 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 85 तर केजमध्ये 216 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-419, अंबाजोगाई-242, आष्टी-42, धारुर-91, गेवराई-54, केज-100, माजलगाव-76, परळी-123, पाटोदा-66, शिरुर-67, वडवणी-34 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक शिगेला पोहोचत आहे. देशात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात दिड हजाराच्या पुढे सरकली आहे. जिल्ह्यात मोकार फिरणाऱ्यासाठी आता केज, बीड व अंबाजोगाई नंतर धारुर शहरातही ॲन्टीजन चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून लसीकरणाचा वेग वाढला आहे.

दरम्यान, देशातील 24 तासातील आकडेवारी
सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!