विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला; नेकनूर परिसरात खळबळ

नेकनूर दि.29 जुलै – नेकनूर येथून जवळच असलेल्या कळसंबर शिवारामध्ये एका विहिरीत (well) मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नेकनूर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
(The woman’s body was found in the well; Excitement in the Neknur area)
नेकनूर जवळील कळसंबर येथील सुवर्णा जीवन तांगडे (वय-26) असे त्या आढळलेल्या मृत महिलेचे नाव आहे. सदरील महिला विवाहित असून दि.28 जुलै पासून बेपत्ता होती. त्यांच्या नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला मात्र त्या आढळून आल्या नाहीत.
आज दि.29 जुलै गुरुवारी सकाळी कळसंबर शिवारातील एका विहिरीत सुवर्णा तांगडेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी एपीआय (API) लक्ष्मण केंद्रे, दीपक खांडेकर, अमोल नवले आदी पोलिसांनी (Police) धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह नेकनूरच्या कुटीर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान विवाहितेने आत्महत्या (suicide) केली की घातपात झाला हे पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.