बीडच्या भुमिपुत्राला राष्ट्रपती शौर्य चक्र पुरस्कार जाहीर.

अंबाजोगाई दि.18 अॉगस्ट – बीडच्या भुमिपुत्राला राष्ट्रपती शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील मुळ रहिवाशी असलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांच्या माध्यमातून बीड (Beed) जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर पोहाचले आहे.
( President Shaurya Chakra to Bhumiputra of Beed Award announced. )
मुळचे बीड जिल्ह्यातील आणि सध्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी असलेले मुंडे डॉक्टर दांपत्याचा मुलगा असलेल्या आयपीएस अधिकारी (IPS officer) सोमय मुंडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मार्डीनटोला जंगलात तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत, धाडसी कार्यवाही करत नक्षली नेता मिलिंदसह 26 जणांना कंठस्नान घातलं. या कारवाईने देशाची व राज्याची मान उंचावली आहे. सोमय मुंडे यांनी अनेक कारवाया करुन नक्षलवाद्याना सळो की पळो केले आहे. त्यांच्या जिगरबाज कारवायांची दखल भारत सरकार घेतली असून त्यांना राष्ट्रपती शौर्य चक्र पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
आएपीएस अधिकारी असणाऱ्या सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटी (IIT) आहे. सोमय यांचे प्राथमिक शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कुल या ठिकाणी झालं आहे. तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज, देहराडून या ठिकाणी झालं आहे. सोमय यांनी आयआयटी व एमटेक ही पदवी मुंबईहून घेतली. सोमय मुंडे हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) 2016 ची परीक्षा पास होऊन आयपीएस (IPS) अधिकारी झाले आहेत. सोमय मुंडे हे देगलूर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. मुक्ता विनायक मुंडे व जनरल सर्जन डॉ.विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना दोन मुले असून सोमय थोरला आहे. धाकटी मुलगी सुमंता यांचे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण चालू आहे.
जिगरबाज कारवाया….
सोमय विनायक मुंडे यांची पहिली पोस्टींग ही औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणची आहे. त्यानंतर एएसपी म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे व आता गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे ऍडिशनल एसपी (Additional Superintendent of Police) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर अनेक धाडसी कारवाया केल्या आहेत. ज्यात नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातील मार्डीनटोला जंगलात तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत, नक्षली नेता मिलिंदसह 26 जणांना कंठस्नान घातलं. मार्च 2021 छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उद्धस्त करत एन्काऊंटर (Encounter) कार्यवाही करुन शस्त्र हस्तगत केले होते. तर जून 2021 रोजी गडचिरोली येथील अटापल्ली येथे धाडसी कार्यवाही करत 13 नक्षलींना कंठस्नान घातले होते.