कोरोंना विशेष

बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये कोरोनाचा भडका…. आश्रमातील २९ जण पॉझिटीव्ह

बीडः दि.२६ (प्रतिनिधी)- बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावात येवले वस्तीवर असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमात एकाच वेळी २९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून तालुका प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत खबरदारीचे उपाय सुरु करण्यात आली आहेत.

(Corona erupts at an ashram in Gevrai in Beed district …. 29 people were infected)

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यासह आश्रमास भेट दिली. गेवराई तालुक्यात असलेल्या या आश्रमात अनेक व्यक्ती निवासी आहेत. गुरुवारी या आश्रमात एक धार्मिक सोहळा झाला. या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून अनेकांनी उपस्थिती लावली होती. आश्रमातील ६० जणांनी आज अँटीजन तपासणी केली असता त्यात तब्बल २९ जण कोरोनाबाधित (Corona Positive) आढळून आली. यामुळे आरोग्य विभाग हादरला असून गुरुवारी सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांनी स्वतःहून समोर येवून आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळून आलेल्या २९ जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने बाधितांच्या संपर्क तपासणीला सुरुवात केली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनासदृश्य लक्षणे असणाऱ्यानी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपली तपासणी व चाचणी करुन घ्यावे असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!