वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 32 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटीव्ह; तिसऱ्या लाटेचे संकेत.

सांगली दि.28 डिसेंबर – मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 32 विद्यार्थिनी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व विद्यार्थिनींच्या विविध चाचण्या (Corona Test) घेण्यात येत आहेत. सध्या कोरोना बाधिताचा वेग दुपटीपेक्षा जास्त असल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता व्यक्त केली जात आहे.
(Corona positive 32 students in medical college; Indications of the third wave.)
लक्षणे सौम्य असल्याचे सांगण्यात आले असले तरी ओमीक्रॉनचे (Omicron) रूग्ण वाढत असतानाच हा प्रकार घडल्याने महाविद्यालय प्रशासनाचे सर्वच विभाग आता सतर्क झाला आहे. मिरज (Miraj) वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थिनीची सोमवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सिद्यार्थिनींची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वजण पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे ही संख्या 32 वर गेली आहे. या विद्यार्थिनींमध्ये लक्षणे अतिशय सौम्य आहेत. विद्यार्थिनी कोणाच्या संपर्कात व कुठे गेल्या होत्या याचा कॉन्टॅक्ट ट्रेेसींग (Contact tressing) सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी कोरोना बाधित (Corona Positive) आढळल्याने पूर्ण हॉस्टेल प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थिनींमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे काळजीचे काहीच कारण नाही. प्रशासन सतर्क असल्याचे मिरज वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसोबतच ग्रामीण भागातही कोरोना व्हायरस (Corona virus) संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने सावध पावले उचलत आगोदरच निर्बंध (restrictions) लागू केले आहेत.
दरम्यान, सांगली (Sangli) येथे 32 विद्यार्थ्यीनींना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय (Miraj Medical College) महिला वस्तीगृहातील (Hostel) मुलींना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. राज्यात रविवारी 1648 रुग्ण आढळले आहेत. हा आकडा लक्षात घेताल सांगलीतील वाढती रुग्णसंख्या आव्हान ठरू शकतो.