कोरोंना विशेष

कोरोना कायम राहणार; आयसीएमआर

नवी दिल्ली दि.10 जुलै – आयसीएमआरने (ICMR) कोरोनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोरोना हा इन्फ्लुएंझासारखाच एन्डेमिक होईल. म्हणजे तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही. त्याचा धोका कायम असेल. फ्लूसारखेच कोरोनाचे रुग्णही दिसून येतील, असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितलं आहे.

(Corona will remain; ICMR)

इन्फ्लूंएझा (Influenza) ज्याला फ्लू म्हणूनही ओळखला जातो. 100 वर्षांपूर्वी याची साथ आली होती. पण आता तो एन्डेमिक आहे. तज्ज्ञांच्या मते, काही काळाने कोरोना हा इन्फ्लुएंझासारखा पॅन्डेमिकवरून एन्डेमिक स्टेजवर असेल . त्यानंतर याचा सर्वात जास्त धोका असलेल्या लोकांना दरवर्षी कोरोना लस (Corona vaccine) घ्यावी लागेल, असं आयसीएमआरच्या (ICMR) साथ आणि संसर्गजन्य विभागाचे प्रमुख समीरन पांडा यांनी सांगितलं.

सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लशी (Corona vaccine) कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सवर (variant) प्रभावी आहे. लस ही इन्फेक्शनपासून पूर्णपणे संरक्षण देते असं नाही पण आजाराची तीव्रता कमी करते, अशी माहिती समीरन पांडा यांनी दिली.
व्हायरसमध्ये म्युटेशन होणं तसं काही नवं नाही.

इन्फ्लूएंझा (Influenza) व्हायरसमध्येही बदल होत राहतो. आम्ही त्यानुसार लशीत थोडेफार बदल करतो. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!