कोरोंना विशेष

राज्यात पुन्हा कोरोनाबाधित व मृतांचा आकडा वाढला… आज मुख्यमंत्र्यांच्या अल्टीमेटमचा शेवटचा दिवस

मुंबई : दि.२८- राज्यात कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ८ हजार ६२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे ५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधत लॉकडाऊन बाबत आठवड्याभराचा अल्टीमेटम दिला होता.

(The state was again affected by the corona and the death toll rose.)

राज्यातील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा शनिवारी गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ८ हजार ६२३ रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात ३ हजार ६४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा २१ लाख ४६ हजार ७७७ वर आतापर्यंत कोरोनामुळे ५२ हजार ९२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २० लाख २० हजार ९५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नवे कोरोना हॉटस्पॉट तयार होत आहेत. यात अमरावीत, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता आलेख सतत चिंतेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला आठवड्याचा अल्टीमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या आठवडाभरात दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. यामुळे पुढे काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून आहे. मात्र सध्या राज्यात अमरावतीत ७ दिवस संचारबंदी, वाशिममध्ये ३८ तास संचारबंदी, हिंगोली जिल्ह्यात ७ मार्च पर्यंत कडक संचारबंदी तर लातूर जिल्ह्यात शनिवार व रविवार जनता कर्फ्यू जाहिर करण्यात आलेला आहे.
(Maharashtra district imposed Curfew)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!