कुत्र्यांमूळे तुंबळ हाणामारीसह विनयभंग; विडा येथील घटना.

बीड दि.29 जून – कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना केज तालुक्यातील विडा येथे घडली असून या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत मारामारी (fighting) केली आहे. सदरील प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे नोंंदवण्यात आली असून यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. (Molestation with fierce fighting caused by dogs; Incident at Vida.
नेमकी काय आहे घटना ?
केज तालुक्यातील विडा येथे एका व्यक्तीने कुत्र्याच्या अंगावरुन गाडी घातली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेले असता कुत्र्याचा मालक तसेच ज्या व्यक्तीने कुत्र्याच्या अंगावरुन गाडी घातली त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. नंतर हा वाद चिघळत गेला. परिणामी या दोन्ही गटामध्ये दगडफेक तसेच तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील चार जण जखमी झाले आहेत.
एकमेकांवर दगडाचा पाऊस
कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत होते. महिला तसेच मुलंसुद्धा या भांडणामध्ये सामील होते. महिला, मुलं आणि पुरुषांनी मिळून एकमेकांवर चक्क दगडांचा मारा केला. यामध्ये एकूण चार जण जखमी झाले आहेत.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर केज पोलिसात (Police) दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशाल मेडियातून (social media) समोर आल्यामुळे झालेली मारामारी पाहून लोक अवाक् झाले आहेत.
महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा
कुत्र्याला धक्का लागल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात एका 30 वर्षीय महिलेचा विनयभंग (Molestation) केल्या प्रकरणी चौघांविरोधात केज पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीप्रमाणे पिडीत महिलेचा भाऊ दि. 28 रोजी सकाळी 11 वाजता मोटारसायकल वरून जात असताना कुत्र्याला धक्का लागला. या कारणा वरून यश दिपक वाघमारे याने शिवीगाळ केली असता पीडित महिला भांडण सोडवण्यास गेली होती. मात्र यावेळी दिपक मच्छीन्द्र वाघमारे याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करत विनयभंग केला. तर इतर तिघांनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून दिपक मच्छिंद्र वाघमारे, विकास मच्छिंद्र वाघमारे, यश दिपक वाघमारे, सिंद्धात विकास वाघमारे (रा. विडा ता. केज) या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रुक्मिणी पाचपिंडे करत आहेत.