क्रिकेटविश्वाला धक्का… ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दि.4 मार्च – क्रिकेटविश्वाला हादरुन सोडणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा (Australia) दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे हृदयविकाराच्या (heart attack) धक्क्याने थायलंड येथे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
( Cricket world shakes … Australia’s veteran spinner Shane Warne dies. )
जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. निधनसमयी शेन वॉर्न हा थायलंडमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्येच होता जिथे तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. 53 वर्षीय वॉर्नच्या निधनाबद्दल भारतीय फलंदाज विरेंद्र सहेवाग याने ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.
जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने संदेश लिहून रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले होते.
1992 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण, 2007 मध्ये निवृत्ती
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्यांनी सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.