क्राईम लाईन… कोरोनाची टेस्ट करत आहोत म्हणत दरोडा; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास…

माजलगाव दि.2 डिसेंबर – भाटवडगाव हद्दीत असलेल्या शिक्षक कॉलनीत शिंदे यांच्या घरात रात्री सहा दरोडेखोर घुसून आम्ही कोरोनाच्या टेस्ट करत आहोत असे म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

(Crime line … robbery saying we are testing Corona; Lampas worth Rs 2.5 lakh …)

लक्ष्मणराव शिंदे व सावित्री शिंदे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुलांसह माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील भाटवडगाव येथील शिक्षक कॉलोनीत वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा राजेश शिंदे हा घरी आला व घरातील मेन गेट ला कुलूप लावून तो झोपण्यासाठी गेला. घरात वृद्ध दाम्पत्य आधीच झोपलेले होते.

दरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेट चे कुलूप तोडत असल्याचा आवाज त्यांना आला. यावेळी शिंदे दाम्पत्याने आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. हम कोरोना टेस्ट (Corona Test) कर रहे है चूप बैठो असे म्हणत घरात सामानाची नासधूस करण्यास सुरुवात केली.

घरातील कपाट उघडून त्यातील 60 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 40 हजारांची पिवळी अंगठी,10 ग्रॅम वजनाच्या जुवा सोन्याचे गंठन, मनिमंगळसूत्र, वेल, झुंबर, चांदीचे दागिने 500 रुपयाच्या 16 नोटा असे एकूण 2 लाख 47 हजाराचा मुद्देमाल लुटून नेला.व घराच्या बाहेरून कडी लावून पोबारा केला. शिंदे यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात (Police station) गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक (Police Inspector) धनंजय फराटे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!