क्राईम…. बीडमध्ये महिलेचा खून; केज तालुक्यात गर्भवती महिलेची आत्महत्या.

बीड/केज 13 सप्टेंबर – बीड शहरात एका विवाहित महिलेचा गळा दाबुन खून (Murder) केल्याचा गुन्हा पेठ बीड पोलिसांत नोंदवण्यात आला असून केज तालुक्यातील दरडवाडी येथील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या गर्भवती पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.
(Crime …. murder of Beed woman; Kaij captive woman commits suicide.)
बीड (Beed) शहरातील पेठ बीड भागात मासुम कॉलनीत राहणाऱ्या महिलेस गळा दाबून मारल्याने बहिनीच्या फिर्यादी वरून पेठ बीड पोलिस स्टेशनला 302 नूसार गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीत नोंदीप्रमाणे, मासुम कॉलनीत मलिका यांचा याकुब शेख खूदबोदिन यांच्याशी विवाह झाला होता. काही दिवसानंतर नवरा याकुब शेख पत्नीवर संशय घेत असल्याने दोघांत कुरबूर चालू असायची.
आरोपीने मुलांना आजी कडे सोडुन दिनांक 11 सप्टेबंर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता गळा दाबून ठार मारले व वरून ऊशी ठेऊन जिवंत राहु नये म्हणून मारल्याने बीड पेठ पोलिसात (Police) गुन्हा नोंद झाला आहे. यातील आरोपीना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीस 3 दिवसाची पोलिस कोठडी (Police custody) सूनावली आहे. पुढिल तपास पोना दासवाड करत आहेत.
केज तालुक्यातील दरडवाडीत आत्महत्या
हुंड्याचे राहिलेले पैसे घेऊन ये म्हणून होत असलेल्या सासु सासरे आणि पतीच्या जाचास कंटाळून पोलीस कर्मचार्याच्या गर्भवती पत्नीने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज (Kaij) तालुक्यातील दरडवाडी येथे घडली. आज दि.13 सप्टेंबर रोजी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ज्योती गोविंद जाधवर या महिलेचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. सदरील महिलेचा पती गोविंद वचिस्ट जाधवर उस्मानाबाद येथे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी ज्योती हिचा सासरच्या लोकांकडून पैशासाठी छळ केला जात असे. शुक्रवारी या महिलेस तिच्या पतीने हुंड्यातील राहिलेले आठ लाख रुपये दोन दिवसांत घेऊन ये अन्यथा जीवे मारण्याची धमकी देऊन माहेरी सोडून गेला होता. परंतु रविवारी सदरील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, सदरील प्रकार नांदूरघाट येथील पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, जयवंत शेप, शेख रशीद यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सदर प्रकरणी पती व सासू सासऱ्या विरोधात केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या लोकांमुळेच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला असून या प्रकरणी दोषीं विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.