क्राईम न्यूज… बीड जिल्ह्यात दोन गंभीर गुन्ह्यांमुळे खळबळ; खूनानंतर अत्याचाराची घटना आली समोर.

बीड दि.21 अॉगस्ट – आज बीड (Beed) जिल्ह्यात सकाळी नेकनूर पोलिस ठाणे (Police station) हद्दीत मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर त्या पाठोपाठ चकलंबा पोलिस ठाणे हद्दीत एका महिलेवर सोशल मिडीयात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
(Crime News … Sensation due to two serious crimes in Beed district; There was an incident of atrocities after the murder.)
आज दि.21 शनिवारी सकाळी नेकनूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मदन मानगिरे याने रात्री 11 ते 12 च्या दरम्यान लाकडी मुसळाने आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत प्रयागबाई यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आईचा मृत्यू झाल्याचं कळताच आरोपीने गावातून पळ काढला आणि महाकाळा येथे सासरवाडीत पोहोचला. येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला शहागड येथून अटक केली. आरोपी मुलाची रवानगी कारागृहात करण्यात आली असून पोलीस (Police)पुढील तपास करत आहेत. या खून (Murder) प्रकरणानंतर दुसरी अत्याचाराची घटना समोर आली आहे.
गेवराई तालुक्यातील श्रींगारवाडी येथील विवाहित महिलेवर नाते संबंधातील व्यक्तिने सोशल मिडीयावर फोटो व्हायरल (Viral) करण्याची धमकी देऊन शेतात मध्ये काम करत असताना जवळ कोणी नसल्याची संधी साधुन एका (28 वर्षीय) महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची घटना चंकलाबा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, विवाहित महिलेला शेतात एकटी पाहून तिचे फोटो आरोपीने काढून सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल करण्याची धमकी दिली व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची फिर्याद पीडीत महिलेच्या वतीने चंकलाबा पोलीसांत देण्यात आली आहे. सदर प्रकरणातील आरोपीस पोलिस उपनिरिक्षक (PSI) डी. बी पवार यांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदरच्या आरोपीचे नाव विक्रम काळे असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक ए.डी. भोसले करत आहेत.