आज ॲन्टीजन टेस्टमध्ये एक पॉझिटीव्ह; ४१ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) काल ४१ लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. दरम्यान आज तालुक्यातील गोपाळपूर येथील एक जनाची ॲन्टीजन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. आजपर्यंत तालुक्यात २३ ॲक्टीव पेशंट असून चौघांची सुट्टी झाली आहे.
शहरात गेल्या अकरा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. आज येथील कोविड केअर सेंटरमध्ये तालुक्यातील गोपाळपूर येथील एकाची ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली. ती पॉझिटीव्ह आल्यामुळे आजच्या तारखेत एकने सुरुवात झाली आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ४१ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. आज येणाऱ्या अहवालात सात पोलिस कर्मचारी तर एका आरोग्यसेविकेच्या अहवालाचा समावेश आहे. सध्या पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांना येथील विलगीकरण कक्षातच ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून सध्या पाच रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.