अबब…. ६१ स्वॅब अहवालाची आज प्रतिक्षा; बँक कर्मचाऱ्यांचा समावेश

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) आज शहरातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ६१ लोकांचे थ्रोट स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे. गेल्या सहा दिवसांत शहरात दररोज पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत असल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या सात दिवसांत आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमुळे शहरात चांगलीच दहशत दिसत आहे. नगर परिषद, पोलिस प्रशासनाकडून ध्वनीक्षेपकातून बाजारासह शहरभर लोकांत जागृती करत नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. काल शहरातील बाधितांच्या संपर्कातील ६१ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. यामध्ये पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटूंबातील व्यक्ती व बँक व्यवस्थपकासह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या स्वॅबचा अहवाल आज प्राप्त होणार आहेत. या अहवालाकडे सर्वाच्या नजरा असुन आजही आरोग्य विभागाकडून संपर्कातील लोकांचे उर्वरित स्वॅब पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शेकडे व डॉ.आदमाने यांनी दिली.