धारुर तालुक्यात धाडसी चोरी; रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास.

किल्ले धारूर दि.25 मे – उकाड्यामुळे घरातील लोक गच्चीवर व बाहेर अंगणात झोपल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख एक लाख रुपये व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना धारुर तालुक्यातील तेलगाव येथील जैतबाला तांड्यात घडली. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, तेलगाव ता.धारूर येथे बीड रोड परिसरात असलेल्या जैतबाला तांडा येथील हिंमत गबरू आडे हे व कुटुंबातील सर्वजण नित्याप्रमाणे सोमवारी (दि.23) रात्री जेवण करुन झोपण्याची तयार करत होते. साधरणता रात्री दहा ते साडे दहा दरम्यान उकाडा जास्त असल्याने हिंमत आडे, त्यांची पत्नी व लहान मुलगा हे तिघे बाहेर अंगणात झोपले तर मोठा मुलगा रमेश हा गच्चीवर झोपला होता.

आडे यांची पत्नी विमल आडे या सकाळी उठल्या असता त्यांना गेट व घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसल्याने त्यांना चोरीचा संशय आला. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन पाहिले तर घरातील कपाटातील सर्व सामान आस्तव्यस्त पडल्याचे दिसले. त्यावर त्यांनी घरातील सर्वांना झोपेतून उठवून सर्व घटना सांगितली. यावेळी कपाटात ठेवलेले ऊसाचे आलेले बील रोख रक्कम एक लाख दहा हजार रुपये तसेच आठ ग्रामचे गंठन, सात ग्रामची बोरमाळ, कानातील चार ग्रामचे झुंबर, चार अंगठ्या व दहा ग्रामचे गळ्यातील लाॅकेट असे सर्व सोन्याचे दागिने ही अज्ञात चोरांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी हिंमत आडे यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी सायंकाळी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा अधिक तपास सपोनि प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ज्ञानेश्वर राडकर व त्यांचे सहकारी करत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी चोरीच्या घटनांचा तपास तात्काळ लावावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

( Daring theft in Dharur taluka; Stolen gold jewelery along with cash. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!