घात-अपघात

DBT डीबीटी करण्यासाठी आलेल्या वृध्देचा मृत्यू ; धारुरमध्ये संजय गांधी योजनेचा बळी.

65 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.27 मार्च 2025 – DBT गेल्या काही महिन्यापासून बंद पडलेली पगार सुरु करण्यासाठी शहरातील तहसील कार्यालयात डीबीटी फॉर्म भरण्यासाठी आलेल्या सत्तर वर्षीय वृध्देचा तहसील कार्यालयात मृत्यू झाल्याची घटना आज दि.27 मार्च गुरुवार रोजी घडली.

कमलबाई बाबुराव कसबे (वय वर्षे 70 रा. मोहा जहागीर) या तहसील कार्यालयात डीबीटी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तहसील कार्यालयातच उष्माघाताचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच मृत्यूने त्यांना गाठले. तहसील कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ योजना आदीचे अनुदान रखडले आहे. ठराविक लाभार्थ्यांचे अनुदान मिळत असल्याने लाभापासून वंचित असलेले शेकडो वृद्ध, निराधार, अपंग लोक पुन्हा पून्हा डीबीटी करण्यासाठी तहसील कार्यालयात येरझऱ्या मारत आहेत. सतत अपमानित होणाऱ्या निराधार लाभार्थ्यांचे आता जीव सुध्दा जात असल्याचे आजच्या घटनेवरुन दिसून आले. या घटनेनंतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!